राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 23:55 IST2021-05-24T23:53:57+5:302021-05-24T23:55:02+5:30
Gaffar Malik, Jalgaon News: मंगळवारी दुपारी २ वाजता ईदगाह मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांचे निधन
जळगाव : राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष हाजी गफ्फार रशीद मलिक (७२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (NCP leader Gaffar Malik passes away)
मलिक यांना रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ऑर्किड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मंगळवारी दुपारी २ वाजता ईदगाह मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी संघटना वाढविण्यासाठी त्यांचे मोठे काम असल्याने जिल्हा एका मोठ्या नेतृत्वाला मुकला असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.