शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 06:45 IST2019-03-28T06:40:37+5:302019-03-28T06:45:04+5:30
पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार आणि निर्मल सिड्सचे चेअरमन आर. ओ. पाटील यांचे निधन झाले.

शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे निधन
जळगाव : पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार आणि निर्मल सिड्सचे चेअरमन आर. ओ. पाटील यांचे निधन झाले.
आर. ओ. पाटील यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, गुरुवारी पहाटे 4.40 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आर. ओ. पाटील यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे
दरम्यान, आज सायंकाळी 5 वाजता पाचोरा येथे आर. ओ. पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...