खान्देशची मुलुख मैदान तोफ थंडावली; माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 20:48 IST2023-08-22T20:47:13+5:302023-08-22T20:48:28+5:30
गुलाबराव पाटील हे तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते. मायबोली अहिराणीतूनच शपथ घेईल, असे म्हणत त्यांनी संपूर्ण विधानसभेचे लक्ष वेधले होते

खान्देशची मुलुख मैदान तोफ थंडावली; माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन
अमळनेर (जि. जळगाव) : खान्देशची तत्कालीन मुलुख मैदान तोफ अशी ओळख असलेले माजी आजी अमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय ९०) यांचे मंगळवारी (दि. २२) सायंकाळी साडेसात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २३ रोजी दुपारी २ वाजता दहिवद ता अमळनेर येथून निघणार आहे.
गुलाबराव पाटील हे तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते. मायबोली अहिराणीतूनच शपथ घेईल, असे म्हणत त्यांनी संपूर्ण विधानसभेचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काढलेला शिंगाडे मोर्चा व विधीमंडळाच्या सभागृहातून राजदंड पळवणे आदी घटना लक्षवेधी ठरल्या होत्या. दमदार व बिनधास्त वकृत्व शैलीने विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारे आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवंत पाटील यांचे वडील तर अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे आजोबा होत.