माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST2021-01-21T04:16:05+5:302021-01-21T04:16:05+5:30
जळगाव : माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा मजूर फेडरेशनच्या ...

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव : माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा मजूर फेडरेशनच्या प्रांगणात रक्तदान शिबिर झाले. याप्रसंगी गुलाबराव देवकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. १३५ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देवकर यांचे कार्यकर्ते खुशाल चव्हाण, सुजित शिंदे व राजेंद्र पाटील यांनी ऑक्सिजन सिलिंडर व कीट भेट दिले. गुलाबराव देवकर यांनी मजूर फेडरेशनचे संचालक व पदाधिकारी, तसेच उपमहापौर सुनील खडके, अशोक लाडवंजारी, अमित काळे, पिंटू काळे, सचिन पाटील, प्रमोद बऱ्हाटे, लकी टेलर, ज्ञानेश्वर महाजन, अतुल हाडा, शुचिता हाडा, सुनील माळी, शरद तायडे, भागवत भंगाळे, सदाशिव ढेकले, डॉ. सुनील महाजन, शिवराम पाटील, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी मजूर फेडरेशनचे सभापती लीलाधर तायडे, रोहिदास पाटील, पुरुषोत्तम चौधरी, अजय सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
कॅप्शन : विशाल देवकर, रोहिदास पाटील, प्रकाश पाटील, पुरुषोत्तम चौधरी, लीलाधर तायडे, वाल्मीक पाटील, प्रदीप पाटील, नीलेश पाटील, अजय सोनवणे.