माजी महापौरांच्या नातेवाईकांवर जळगावात हल्ला, तीन युवक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 17:14 IST2019-01-04T17:14:20+5:302019-01-04T17:14:31+5:30
रस्त्यात कुत्रे मागे लागतात म्हणून त्यांनी हातात प्लास्टिकचा पाईप घेतला होता.

माजी महापौरांच्या नातेवाईकांवर जळगावात हल्ला, तीन युवक जखमी
जळगाव : जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांचे नातेवाईक असलेल्या तीन तरुणांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जुने जळगावात गुरुवारी रात्री १०.१५च्या सुमारास घडली.
चेतन युवराज कोल्हे, युवराज यशवंत कोल्हे, सुजय एकनाथ कोल्हे (रा. कोल्हेवाडा, जुने जळगाव) अशी या जखमींची नावे आहेत.
हे तीनही जण आईसक्रीम घेण्यासाठी जात होते. रस्त्यात कुत्रे मागे लागतात म्हणून त्यांनी हातात प्लास्टिकचा पाईप घेतला होता. त्यांच्या हातात पाईप पाहून गैरसमज झाल्याने आकाश उर्फ धडकन सुरेश कोळी, सागर उर्फ झंप्प्या आनंदा कोळी व विशाल बुनकर (रा. जुने जळगाव) यांनी धारदार शस्त्राने वार केले. यात तीनही जण जखमी झाले. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही मारेकरी पसार झाले आहेत.