Former mayor assaulted at builder | बांधकाम व्यावसायिकावर माजी महापौराचा प्राणघातक हल्ला

बांधकाम व्यावसायिकावर माजी महापौराचा प्राणघातक हल्ला

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद प्रेमचंद साहित्या (५०, रा.सिंधी कॉलनी) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. माजी महापौर तथा भाजपचे सभागृह नेते ललित विजयराव कोल्हे व सहकाºयांनी हल्ला केल्याचा दावा साहित्या यांचा मुलगा नितीन याने केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजता नवी पेठेतील गोरजाबाई जिमखान्यात घडली. दरम्यान, या हल्ल्यानंतर जिमखान्यातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे डीव्हीआर लांबविल्यात आला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील गोरजाबाई जिमखान्याजवळ गुरुवारी रात्री आठ वाजता खुबचंद साहित्या व ललित कोल्हे यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. साहित्या यांचा मुलगा नितीन याने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार कोल्हे व त्यांच्यासोबत असलेल्या सात ते आठ जणांनी खुबचंद यांना जिमखान्याच्या आवारात मारहाण करीत नंतर जिमखान्यात आणले. तेथे लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.हल्ला करताना काही तरी टणक वस्तूचा वापर झाला. त्यात साहित्या यांच्या डोक्याला, नाकाला व पोटात बेदम दुखापत झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत सोडून कोल्हे व त्यांचे सहकारी तेथून निघून गेले. 

Web Title: Former mayor assaulted at builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.