विजयाच्या अत्यानंदात काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 18:52 IST2018-12-12T18:52:09+5:302018-12-12T18:52:39+5:30

तालुकाध्यक्षांनी तीन राज्यांत काँग्रेसच्या विजयाचा फोन केला आणि सत्काराला येण्याचे निमंत्रण दिले.

Former Congress Taluka President dies in victory happiness | विजयाच्या अत्यानंदात काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांचे निधन

विजयाच्या अत्यानंदात काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांचे निधन

जळगाव :  तीन राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्याच्या अत्यानंदात काँग्रेसचे पारोळा येथील माजी तालुकाध्यक्ष सुरेश सुका ठाकरे (७२, रा. वंजारी ता. पारोळा) यांचे हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाल्याची घटना बुधवारी घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरन अनुष्ठान यांनी मंगळवारी जुने जेष्ठ कार्यकर्ते  ठाकरे यांना फोन करुन विजय उत्सवासाठी पारोळा येथे या, असा निरोप दिला. काँग्रेसला तीन राज्यात यश मिळाल्याचे फोनवर ऐकत असतानाच आनंदात ठाकरे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लागलीच धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. 

ठाकरे हे सुरुवातीपासून काँग्रेसचे कार्यकर्ते होते. तालुका सरचिटणीस व नंतर तालुकाध्यक्षही म्हणूनही त्यांनी काम पाहिले, अशी माहिती अनुष्ठान यांनी दिली. ठाकरे त्यांच्यावर १२ रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Former Congress Taluka President dies in victory happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.