सिमेंटच्या जंगलात, पुरणपोळ््याचे खापर आले अंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 12:02 IST2019-05-07T12:02:16+5:302019-05-07T12:02:35+5:30
संजय हिरे खेडगाव, जि. जळगाव : आज अक्षयतृतीया, अर्थात आखाजीचा सण. खेडोपाडी घरोघरी खापराच्या पुरणपोळ्या अन् आमरसाचे जेवण हा ...

सिमेंटच्या जंगलात, पुरणपोळ््याचे खापर आले अंगणात
संजय हिरे
खेडगाव, जि. जळगाव : आज अक्षयतृतीया, अर्थात आखाजीचा सण. खेडोपाडी घरोघरी खापराच्या पुरणपोळ्या अन् आमरसाचे जेवण हा पूर्वपार बेत ठरलेलाच. पूर्वी धाब्याच्या घरात मातीच्या चुली खापर ठेवण्यासाठी हमखास असत. आता जग बदलले. खेड्यातही सिमेंटची घरे उभी राहिली अन् धूर होईल व घरे काळे होतील म्हणून चूल हद्दपार झाली. काही ठिकाणी जुन्या-नव्याचा संगम घालीत बाहेर व अंगणात मोकळ््या जागी चूल आली. आता ही पुरणपोळी अंगणातील खापरावर आकार घेऊ लागली. खेडगाव ता.भडगाव येथील एका अंगणात चार घरच्या चार आया - बाया आणि आजीबाई एकत्र येत सुरु असलेला हा खान्देशी खापराच्या पोळींचा [पुरणपोळी] सोहळा.