कोरोना चाचणीनंतरही कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST2021-02-05T05:51:57+5:302021-02-05T05:51:57+5:30
गेल्या चार महिन्यांपासून मुंबई येथे जळगावसह विविध आगारातील चालक एक आठवडा सेवा बजाविण्यासाठी जात आहेत. तेथून आल्यानंतर या कर्मचाऱ्यांची ...

कोरोना चाचणीनंतरही कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती
गेल्या चार महिन्यांपासून मुंबई येथे जळगावसह विविध आगारातील चालक एक आठवडा सेवा बजाविण्यासाठी जात आहेत. तेथून आल्यानंतर या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मात्र, चाचणी नंतर या कर्मचाऱ्यांना होम क्वाॅरंटाईन न ठेवता, कामावर बोलाविण्यात येत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांमधून होत आहेत. गेल्याच आठवड्यात एक चालक मुंबईहून आल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, या कर्मचाऱ्याला होम क्वाॅरंटाईन न ठेवता पुन्हा नाशिक येथे बस घेऊन मुक्कामी पाठविले होते. मात्र, दोन दिवसांनंतर या कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या प्रकारानंतर काही कर्मचाऱ्यांनी इंटकचे पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असून, या वृत्ताला इंटकचे विभागीय सचिव नरेंद्रसिंग राजपूत यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान या प्रकाराबाबत महामंडळ प्रशासनातर्फे महामंडळाच्या नियमानुसार कामकाज सुरू असल्याचे सांगण्यात आले.