अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्याला पाच वर्ष कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 19:59 IST2018-07-11T19:48:45+5:302018-07-11T19:59:38+5:30
१४ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करणाºया सादीक मकबुल सय्यद (वय २१ रा.शिवाजी नगर, जळगाव) याला बुधवारी न्यायालयाने विविध कलमाखाली ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्याला पाच वर्ष कारावासाची शिक्षा
जळगाव : १४ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करणाºया सादीक मकबुल सय्यद (वय २१ रा.शिवाजी नगर, जळगाव) याला बुधवारी न्या.जे.पी.दरेकर यांच्या न्यायालयाने विविध कलमाखाली ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
पीडित मुलगी ३० जुलै २०१५ रोजी सकाळी अकरा वाजता घरात असताना सादीक याने तुझ्या वडीलांनी वडापावचा मसाला मागितला आहे असे सांगून घरात प्रवेश केला व पीडित मुलीशी अश्लिल वर्तन केले होते. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आई व वडीलांना जीवे ठार मारेल अशी धमकी दिली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला सादीक याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
न्या.जे.पी.दरेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विकी शिंदे, तपासाधिकारी दीपक गंधाले व अन्य तीन असे सहा साक्षीदार तपासण्यात आले. बाललैंगिक शोषण कायदा २०१२च्या कलम ८ अन्वये ३ वर्ष कारावास, कलम ४५१ अन्वये १ वर्ष कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ५०६ अन्वये १ वर्ष कारावास, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कैद यासह दीड हजार रुपये पीडितेला व पाचशे रुपये न्यायालयात भरणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. सरकारतर्फे अॅड.शिला गोडंबे, फिर्यादीतर्फे अॅड.संतोष सांगोळकर व आरोपीतर्फे अॅड.विजय दर्जी यांनी काम पाहिले.