पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे अवैध वाळूचे पाच ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:56 IST2020-04-12T17:54:58+5:302020-04-12T17:56:04+5:30
परधाडे या गावी एकाच ठिकाणी पाच ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना महसूल विभागाने जप्त केले.

पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे अवैध वाळूचे पाच ट्रॅक्टर जप्त
पाचोरा, जि.जळगाव : कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असताना अवैध वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आणि त्याच दिवशी धडक कारवाई महसूल विभागाने केली. गिरणीच्या काठावरील परधाडे या गावी एकाच ठिकाणी पाच ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना गोपनीय माहितीच्या आधारावर महसूल विभागाने जप्त केले.
तहसीलदार कैलास चावडे, मंडळ अधिकारी पवार, मंडळ अधिकारी साळुंके, पाचोरा तलाठी आरडी पाटील, भारत गायकवाड, मयूर आगरकर, सागर बागुल, स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी झाली. अशाचप्रकारे अवैधरित्या वाळू साठे केलेल्या बांधकाम व्यावसायिकांवर साठ्याचा लिलाव करून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.