भुसावळचे पाच जण जिल्ह्यातून हद्दपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2022 16:21 IST2022-11-12T16:20:11+5:302022-11-12T16:21:25+5:30
सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या भुसावळ येथील पाच जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

भुसावळचे पाच जण जिल्ह्यातून हद्दपार!
नरेंद्र पाटील
भुसावळ जि. जळगाव : सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या भुसावळ येथील पाच जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यात चार जणांच्या टोळीला दोन वर्षासाठी तर एकाला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश प्रांत रामसिंग सुलाने यांनी बजावले आहेत.
टोळी प्रमुख असलेला गौरव सुनील बढे, जितेंद्र शरद भालेराव, सचिन अरविंद भालेराव आणि भावेश कांतीलाल दंडगव्हाळ ही चार जणांची टोळी तसेच कृष्णा खरारे याचा हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. यांच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, नागरिकांना शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे, अवैध शस्त्र वाढविणे असे अनेक गुन्हे दाखल होते.