धरणगाव ग्रामीण रुग्णालयास पाच हायड्राॅलिक बेड भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:10+5:302021-09-12T04:20:10+5:30
धरणगाव : कृषी क्षेत्रात अग्रेसर असणारी सिजेंटा इंडिया लिमिटेड कंपनीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयास पाच हायड्राॅलिक बेड उपलब्ध ...

धरणगाव ग्रामीण रुग्णालयास पाच हायड्राॅलिक बेड भेट
धरणगाव : कृषी क्षेत्रात अग्रेसर असणारी सिजेंटा इंडिया लिमिटेड कंपनीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयास पाच हायड्राॅलिक बेड उपलब्ध करून दिले. कोरोना काळात अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागले तर काही ना यात जीवदेखील गमवावा लागला. समाजासाठी देणं म्हणून धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाची गरज ओळखून सिंजेटा कंपनीने बेड भेट दिले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष विलास महाजन, गटनेते विनय भावे, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना विभाग प्रमुख संजय चौधरी, आस्था ॲग्रोचे संचालक माधव पाटील, मुकेश ॲग्रोचे संचालक राजेंद्र पाटील, लक्ष्मीनारायण ॲग्रोचे संचालक प्रदीप पाटील व प्रतिनिधी गोविंदा, योगेश पाटील तसेच रुग्णालयीन कर्मचारी महेंद्र माळी, अविनाश चौधरी, शिवसैनिक शैलेश महाजन, गोपाल चौधरी, अरविंद चौधरी व शेतकरी बांधव उपस्थित होते. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक सुधीर आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच डाॅ. गिरीश चौधरी यांनी ग्रामीण रुग्णालयातर्फे आभार मानले.
110921\img-20210911-wa0016.jpg
धरणगांव ग्रामीण रूग्णालयास सिजेंटा(बियाणे) कंपनी तर्फे पाच हायड्राॅलिक बेड भेट..