बिबट्याने पाडला पाच गो-ह्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:22 PM2019-02-05T23:22:39+5:302019-02-05T23:23:24+5:30

रानडुकराच्या हल्ल्यात तरुण जखमी

Five fliers | बिबट्याने पाडला पाच गो-ह्यांचा फडशा

बिबट्याने पाडला पाच गो-ह्यांचा फडशा

Next

जळगाव : जामनेर व भडगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून खेडगाव परिसरात चार दिवसात तीन गोºह्यांचा तर मंगळवारी पहाटे जामनेर तालुक्यातील वडगाव सद्दो येथे दोन गोºह्यांचा फडशा पाडला. या सोबतच ४ रोजी जामनेर तालुक्यातील वडगाव सद्दो येथील दीपक कौतिक दांडगे या तरुणावर रानडुकराने हल्ला करून जखमी केले. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
खेडगाव, ता.भडगाव
सोमवारी रात्री उशिराने पेंडगाव-पथराडच्या जंगलालगत जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेल्या सहादू धर्मा पाटील या शेतकºयाच्या गोºह्यावर बिबट्याने हल्ला चढवत फडशा पाडला. यामुळे पारोळा-भडगाव या दोन तालुक्यांच्या सीमेवरील वनास लागून असलेल्या पेंडगाव, शिवरे, तामसवाडी, पथराड, रताळे आदी गावांतील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरे, कॅमेरे आदी लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे यांचा गेल्या काही दिवसांत या भागात उपद्रव वाढला आहे.
२८ रोजी पेंडगावी, १ रोजी तामसवाडी, ता.पारोळा व पुन्हा दि.४ च्या रात्री असे तीन दिवस मिळून या मादी बिबट्याने तीन गोºह्यांचा फडशा पाडला. वनविभागाने हे पंचनामे केले असले तरी पंचनाम्यावरच त्यांचे अडले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कारण बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असतानाच वनविभागाकडृन त्यास पकडण्यासाठी ंिपंजरे, कॅमेरे लावणे आदी काही एक उपाययोजना करण्यात येत नसल्याने येथे संताप व्यक्त होत आहे. या जंगलास लागून भडगाव तालुक्यातील पेंडगाव, पथराड,जुवार्डी,आडळसे तर पारोळा तालुक्यातील शिवरे,तामसवाडी,रताळे आदी गावे येतात. जंगल असल्याने या गावांमधून पशुपालनाचा व्यवसाय वाढला आहे. यामुळे गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट-तिप्पट जनावरांची संख्या येथे आहे. ही जनावरे शेतात-रानात उघड्यावरच बांधलेली असतात. बिबट्याचा वावर वाढल्याने पशुपालकांनी धास्ती घेतली आहे. आधीच दुष्काळ, त्यातच मादी बिबट्याचे हल्ले सुरुच असल्याने जनावरांविषयीची चिंता लागली आहे. आज जनावरांच्या रक्ताची चटक लागलेला बिबट्या उद्या रात्री-बेरात्री शेतावर जाणाºया शेतकºयांच्या जीवावर उठणार नाही हे कशावरुन, अशी भीती व्यक्त होत आहे.
तोंडापूर, ता.जामनेर
येथून जवळच असलेल्या वडगाव सद्दो येथे ५ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास विमलबाई सुरेशचंद शर्मा यांच्या मालकीच्या शेतात साधारण तीन वर्षे वयाच्या दोन गोºह्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. वनपाल बळवंत पाटील, वनरक्षक समाधान धनवट, गणेश खंदारे यांनी पंचनामा केला. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. मृत गोºह्याचे पशुधन विकास अधिकारी राहुल ठाकूर यांनी शवविच्छेदन केले. याच शिवारात ४ रोजी सकाळी दीपक कौतिक दांडगे या तरुणावर रानडुकराने हल्ला करून जखमी केले. दीपक दांडगे याच्यावर जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन बिबट्यांचा संचार
या परीसरात एक नर व मादी अशा दोन बिबट्यांचा वावर असून वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. वन्यप्राणी, बिबट्यापासून रक्षण होण्यासाठी पशूधन सुरुक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: Five fliers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव