शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

नगर जिल्ह्यातील चौघांच्या हत्येप्रकरणी जळगावमधून पाच जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 13:37 IST

स्वस्तात सोने प्रकरण अंगाशी : पैशाची बॅग घेऊन पलायन करताना घडली घटना जळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर फाटा (ता.श्रींगोदा) ...

स्वस्तात सोने प्रकरण अंगाशी : पैशाची बॅग घेऊन पलायन करताना घडली घटनाजळगाव : अहमदनगर जिल्ह्यातील विसापूर फाटा (ता.श्रींगोदा) येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या चार जणांच्या हत्येप्रकरणात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने जळगाव शहरातून नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (२२), प्रेमराज रमेश पाटील (२२), योगेश मोहन ठाकूर (२२), कल्पना किशोर सपकाळे (४०) व आशाबाई जगदीश सोनवणे (४२) सर्व रा.हरिविठ्ठल नगर, जळगाव या पाच जणांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. शनिवारी पहाटे ते अहमदनगरला पोहचले.श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी नातीक कुंजीलाल चव्हाण (४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (३५), नागेश कुंजीलाल चव्हाण (१४) रा.सुरेगाव, ता.श्रींगोदा व  लिंब्या हाबºया काळे (२२, रा.देऊळगाव सिध्दी, ता.अहमदनगर) यांची चाकू व इतर धारदार शस्त्राने हत्या झाली होती. यातील नातीक, श्रीधर व नागेश हे तीन सख्खे भाऊ होते. अक्षय कुंजीलाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन अक्षय उंबºया काळे व मिथुन उंबºया काळे यांच्यासह इतर सहा जणांविरुध्द श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.एटीएमकार्डवरुन धागेदोरे जळगावाकडेया घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली असता तेथे एक एटीएम कार्ड आढळून आले होते, ते जळगाव शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. अधिकच्या चौकशीत श्रीधर व लिंब्या या दोघांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जळगाव येथून पाच जणांना बोलावले होते. त्यात दोन महिला होत्या. ठरल्याप्रमाणे वेळेवर व ठिकाणावर सर्व जण विसापूर फाट्याजवळ जमले असता जळगावच्या लोकांजवळील पैशाची बॅग हिसकावून दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच जळगावातील एकाने चौघांवर चाकू हल्ला केला. यात प्रतिकार म्हणून दोन्ही गटाने एकमेकावर हल्ला केला. त्यात नातीक, श्रीधर, नोगेश व लिंब्या असे चौघं जण ठार झाले. एटीएम कार्ड व तांत्रिक माहितीच्या आधारावर धागेदोरे जळगावकडे असल्याचे निष्पन्न झाले.दोन एसपींच्या समन्वयातून संशयित जेरबंदहत्येच्या गुन्ह्यातील आरोपी जळगावातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अहमदनगर पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी जळगावचे अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क साधून आरोपी व घटनेची माहिती दिली. दोघांच्या समन्वयातून ही जबाबदारी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व जळगावचे निरीक्षक बापू रोहोम एकमेकांच्या संपर्कात आले. तेथून उपनिरीक्षक गणेश इंगळे, विश्वास बेरड, विशाल दळवी, संदीप दरंदले, रवींद्र घुंगासे व संभाजी कोतकत यांचे पथक शुक्रवारी जळगावात आले. शहरातील गुन्हेगारीचा अभ्यास असलेले विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, जितेंद्र पाटील, अशरफ शेख व अलका शिंदे यांचे पथक नगरच्या पथकासोबत दिले. या पथकाने दिवसभर शोध मोहीम राबवून पाचही जणांना ताब्यात घेतले. स्वस्तात सोने घेण्यासाठी आपण तिकडे गेलो होतो व तेथे वाद झाल्याची कबुली या पाचही जणांनी पोलिसांकडे दिली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव