मालखेडा शिवारातील तार चोरीप्रकरणी पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:55 IST2018-11-29T17:52:57+5:302018-11-29T17:55:44+5:30
मालखेडा, ता.जामनेर येथून महावितरण कंपनीच्या विद्युत पोलवरून दीड लाख रुपये किंमतीच्या वीज तारांची चोरी केल्याप्रकरणी पहूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक करीत मालवाहतूक करणाऱ्या वाहनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मालखेडा शिवारातील तार चोरीप्रकरणी पाच आरोपींना अटक
पहूर, ता. जामनेर : मालखेडा, ता.जामनेर येथून महावितरण कंपनीच्या विद्युत पोलवरून दीड लाख रुपये किंमतीच्या वीज तारांची चोरी केल्याप्रकरणी पहूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक करीत मालवाहतूक करणाऱ्या वाहनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मालखेडा येथून दि. २३ रोजी अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने विद्युत पोल खाली पाडून दीड लाख किंमतीच्या तारांची चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी साहाय्यक अभियंता नीलेश मिश्रीलाल चौधरी यांनी पोलीसात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात गुप्त माहिती पहूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, संदीप जगताप, दिनेश लाडवंजारी, दीपक जाधव यांच्या पथकाने भुसावळात छापा मारला. याठिकानावरून अब्दुल समद जमीन उल्लाखान (रा.नायगाव ता.भिवंडी जि.ठाणे), अशिषसिंग केशवसिंग (रा.रत्मपूर श्रीरामपूर, ता.किराकंद, जि. बनारस), नीलेशसिंग केशवसिंग, आसिक सलाम खान (रा.कमारिया, ता . डोंगरीगंज उ.प्र.जि.सिदार्थनगर) व समसोद्दीनखान नबीरहमखान (रा.कुलही,ता.फरीदा जि.महाराजगंज, उत्तरप्रदेशन) या पाच जणांना ताब्यात घेतले. अटकेतील संशयितांकडून पहूर पोलिसांनी दीडलाख किमतीचे ६९५ किलो वजनाचे तार व चार लाख किमतीचे वाहन असा साडे पाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे. तार चोरी करणाºया टोळीचा पदार्फाश पोलिसांनी केला आहे.