शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 2:31 AM

डॉ. अश्विन व निर्मला झाला यांची कामगिरी

आकाश नेवेजळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशासाठी निधी कसा उभारला, यावर जळगावातील गांधी रिसर्च फाऊंडेशनमधील डाॅ. अश्विन झाला व निर्मला झाला यांनी संशोधन करीत पीएचडी मिळविली आहे.

अश्विन झाला हे २०१० मध्ये जळगावला आले. त्यावेळी जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांनी झाला दाम्पत्याला या विषयावर पीएचडी करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. हे संशोधन सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यापीठात सादर करीत त्याची मुलाखत नोव्हेंबर २०२० मध्ये झाली.

अश्विन झाला हे भावनगरच्या एमएसडब्लू महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी संशोधनासाठी जळगावला आल्या होत्या. सध्या हे दाम्पत्य या ठिकाणी रिसर्च असोसिएट्स आणि संपादक म्हणून काम करत आहे तर निर्मल झाला या ठिकाणी रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी यांनी कशा पद्धतीने निधी संकलित केला. कोणत्या कामासाठी केला. त्यातून त्यांनी काय साध्य केले, यावर संशोधन केले आहे. गांधीजी निधी संकलित करताना तो सामान्य माणसांमधून करत असत. बऱ्याचदा ते काही वस्तूंचा लिलाव करीत होते. मानपत्रासोबत आलेल्या लाकडी बॉक्स किंवा गरजच नसलेल्या वस्तूंचा संग्रह करण्यापेक्षा त्याचा लिलाव करून ते निधी संकलित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वराज्य फंडातून १ कोटी १५ हजार रुपयांचा निधीलंडनमध्ये शिक्षण झाल्यानंतर गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळी १८९७ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि १४०० पाैंडाचा निधी उभारला आणि कलकत्ता (कोलकाता) येथे भारताच्या व्हाईसरॉयकडे पाठवला होता. त्यांनी १ कोटी १५ हजार रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडातून उभा केला होता, असेही झाला दाम्पत्याने सांगितले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीJalgaonजळगाव