चाळीसगाव : पश्चिमेकडे अस्ताला जाणारा सूर्यनारायण... सांज मिणमिणता अंधार पांघरुन मुक्कामी आलेली... धनोत्रोदशीचा अपूर्व उत्साह शुक्रवारी ओसंडून वाहत असतानाच जुन्या न.पा.कार्यालयाशेजारील शिवाजी घाट लख्ख दिव्यांच्या उजळवातीत न्हाऊन निघाला होता. पहिला दिवा शिवप्रभूंच्या पायी, असे म्हणत सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी दिवे प्रज्वलित केले.मंद उजळणा-या पणत्या आणि विद्युत दिव्यांच्या रोषणाईने हा परिसर लखलखून निघाला. यावेळी प्रतिष्ठानच्या सदास्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ! असा जयघोषही केला. दिवाळीचे पर्व सुरू झाले असल्याने प्रतिष्ठानने अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मानवंदनाही देण्यात आली.यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, गजानन मोरे, नीलेश हमलाई, रवींद्र सूर्यवंशी, विनोद शिंपी, दिगंबर शिर्के, गौरव पाटील, जितेंद्र वरखेडे, सोहम येवले आदी उपस्थित होते.
चाळीसगावला पहिला दिवा शिवप्रभूंच्या चरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 21:35 IST
पहिला दिवा शिवप्रभूंच्या पायी, असे म्हणत सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी दिवे प्रज्वलित केले.
चाळीसगावला पहिला दिवा शिवप्रभूंच्या चरणी
ठळक मुद्देसह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रमशिवाजी घाटावर दिव्यांची दिवाळी