Video : केमीकल कंपनीला भीषण आग, सुदैवाने कुटुंब बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 09:01 PM2019-06-30T21:01:04+5:302019-06-30T21:01:32+5:30

कंपनीतील केमिकल जसे जसे बाहेर पडत होते. त्यापध्दतीने आग पसरत होती.

The fires of the chemical company, luckily the family escaped in jalgaon | Video : केमीकल कंपनीला भीषण आग, सुदैवाने कुटुंब बचावले

Video : केमीकल कंपनीला भीषण आग, सुदैवाने कुटुंब बचावले

Next

जळगाव - शहरातील एमआयडीसी परिसरात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जी.सेक्टरमधील रवी इंडस्ट्रीज कंपनीला अचानक आग लागली. कंपनीतील केमिकलचे टाक्या फुटून आगीने काही मिनिटांतच भीषण रुप धारण केले. काही वेळातच रवी इंडस्ट्रीज या कंपनीसह तिच्या बाजूची अविजिता इंटरप्रायझेस ही प्लास्टिकचे पीव्हीसी पाईप बनविणारी कंपनीच्या आगीच्या लपेट्यात सापडली. 

कंपनीतील केमिकल जसे जसे बाहेर पडत होते. त्यापध्दतीने आग पसरत होती. घटनास्थळापासून सुमारे 500 मीटरपर्यंत नालीतून वाहणार्‍या केमिकलला आग लागली होती. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचत असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. बेहडेनामक कुटंब रवि इंडस्ट्रीजच्या बाजुला राहते. आग लागल्याचे वृत्त समजताच नवीन बेहडे यांनी आपल्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना घराबाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच बेहडे यांचीही अविजिता कंपनी आगीच्या लपेटात आली. सुदैवाने, बेहडे कुटुंबीयांचे प्राण वाचले. 



 

Web Title: The fires of the chemical company, luckily the family escaped in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.