जळगाव जिल्ह्यात अखेर वरुणराजाची हजेरी, जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:22 IST2019-06-23T13:22:18+5:302019-06-23T13:22:52+5:30

जोरदार पाऊस होत नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे

Finally rain fall in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात अखेर वरुणराजाची हजेरी, जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम

जळगाव जिल्ह्यात अखेर वरुणराजाची हजेरी, जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम

जळगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रतीक्षा असलेल्या वरूण राजाने अखेर रविवारी पहाटे जळगाव शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली. केवळ १० ते १५ मिनिटे पाऊस झाल्याने जिल्हासायीयांच्या आनंदावर पाणी फिरले. सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असले तरी जोरदार पाऊस काही होत नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत.
रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जळगाव शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एकदाचा पाऊस आला म्हणून सर्वांना आनंद झाला. मात्र १० ते १५ मिनिटेच पाऊस झाला व तो पुन्हा गायब झाला. पावसामुळे काही वेळ वीजपुरवठाही खंडीत झाला.
भुसावळ तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जामनेर तालुक्यात अर्धातास पावसाने जोरदार हजेरी लावली. या सोबतच मुक्ताईनगर, बोदवड, चाळीसगाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.

Web Title: Finally rain fall in Jalgaon district