अखेर आयसीयूच्या बाहेरील भंगार उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 21:54 IST2019-11-26T21:53:46+5:302019-11-26T21:54:04+5:30

जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या बाहेर भंगार पडून त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ ...

Finally picked up the wreckage outside the ICU | अखेर आयसीयूच्या बाहेरील भंगार उचलले

अखेर आयसीयूच्या बाहेरील भंगार उचलले

जळगाव : जिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या बाहेर भंगार पडून त्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ यामुळे यंत्रणा जागी होऊन अखेर हे भंगार या ठिकाणाहून हलविण्यात आले असून स्वच्छता करण्यात आली आहे़ आता या ठिकाणी डासांचा त्रास नसल्याचे चित्र आहे़
जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वच्छतेचा मुद्दा गंभीर बनला होता़ अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेर बसणे डासांमुळे जिकरीचे होत होते़ ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात हा मुद्दा समोर आला होता़ दरम्यान, शिवसेनेच्या ग्राहक कक्षांकडूनही सिव्हीलच्या स्वच्छतेबाबत आवाज उठविण्यात आला होता व पूर्ण जिल्हा रूग्णालयात स्वच्छता न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता़ जिल्हा रूग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने पावले उचलली जात असून दक्षता घेतली जात असल्याचे चित्र आहे़

Web Title: Finally picked up the wreckage outside the ICU