शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पिंपरखेड येथे अखेर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 7:28 PM

पिंपरखेड येथे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेत अखेर बुधवारपासून टँकर सुरू केले. टँकरचे पाणी गावविहिरीत ओतले जाईल व नळांद्वारे थेट ग्रामस्थांना पाणीपुरवठा होईल.

ठळक मुद्देपहिल्या टँकरने गावविहिरीत ओतले पाणी‘लोकमत’च्या वृत्ताचा परिणामपाणीटंचाईचे संकट तूर्त टळलेकायमस्वरुपी उपाययोजना हवी

पिंपरखेड, ता.भडगाव : चार हजार लोकसंख्येच्या पिंपरखेड येथे पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनाने गांभिर्याने दखल घेत अखेर बुधवारपासून टँकर सुरू केले. टँकरचे पाणी गावविहिरीत ओतले जाईल व नळांद्वारे थेट ग्रामस्थांना पाणीपुरवठा होईल. हा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरला होता.पिंपरखेड येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच भटकंती करावी होती. प्रशासनाने पाणी प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रमोद मधुकर भोसले यांच्यासह ग्रामस्थ पिंपरखेड ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसले होते.प्रशासनाने वेळीच लक्ष घालून गावासाठी दोन टँकर मंजूर केले. त्याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाण्याचे टँकर ओतण्याच्या कामासही आजपासूनच सुरुवात झाली. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती तूर्त थांबणार आहे. तसेच गावातील पाणीपुरवठ्यातही लवकरच सुधारणा होईल. असे असले तरी गावासाठी कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे.गावातील पाणी प्रश्नाबाबत ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात वृत्त दिले होते. त्यातच बेमुदत उपोषणही सुरू झाले. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत आजपासून टँकर सुरू केले.‘लोकमत’ने आमच्या प्रश्न प्रशासनासमोर मांडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. याबद्दल ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.टँकरमुळे माणसांचे व गुरांचे पिण्याच्या पाण्याचे संकट टळले आहे.-गजानन नन्नवरे, ग्रामविकास अधिकारी, पिंपरखेडगावातील नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा. पाणी वाया घालू नये.-विलास पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, पोलीस पाटील संघटनाआमच्या गावातील पाण्याची समस्या ‘लोकमत’मुळेच सुटली. लोकांना पाण्याचे मूल्य कळले.-अ‍ॅड.विश्वासराव भोसले, उपसभापती, बाजार समिती,पाणी जपून वापरले तर पाण्याची समस्या भविष्यात निर्माण होणार नाही. गावातील पाण्याचा गंभीर प्रश्न टँकरमुळे सुटला आहे.-सुधीर पाटील, माजी चेअरमन, वि.का.संस्था, पिंपरखेड 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव