मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:04 IST2020-06-04T18:03:29+5:302020-06-04T18:04:46+5:30
उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तत्काळ भरण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मुक्ताईनगर भेटीप्रसंगी देण्यात आल.े

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरा
मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तत्काळ भरण्यात यावी यासह आरोग्य विभागाशी सांबंधित विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मुक्ताईनगर भेटीप्रसंगी तालुका काँग्रेसतर्फे देण्यात आल.े
येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी वर्ग अत्यंत अल्प आहे. रुग्णालयात तातडीने एम.डी. मेडिसिन, बालरोगतज्ज्ञ, शल्य चिकित्सक, रेडिओलॉजिस्ट, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तत्काळ नेमणूक करावी. तसेच मुक्ताईनगरसाठी एक अॅब्यूलन्स, एक शववाहिनी, एक शवपेटीची अत्यंत गरज आहे. तसेच कुºहा व अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी एक अॅम्ब्युलन्स तत्काळ मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, ुजि.प.चे माजी गटनेते विनोद तराळ, आत्माराम जाधव, काँग्रेस जिल्हा सचिव आसिफ खान इस्माईलखान, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.