लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 22:56 IST2021-06-24T22:56:42+5:302021-06-24T22:56:50+5:30
अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील लोकनियुक्त सरपंच छाया वसंत मोरे यांच्यावर १० सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील लोकनियुक्त सरपंच छाया वसंत मोरे यांच्यावर १० सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून तहसीलदार मिलिंद वाघ यांनी २९ रोजी सकाळी ११ वाजता अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभा बोलावली आहे.
अमळगाव ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती प्रवर्गाचा लोकनियुक्त सरपंच आहे. ग्रामपंचायतीत सरपंचसह १२ सदस्य असून रेखा संजय चौधरी, चंदना विश्वास पाटील, मिलिंद गुलाबराव पाटील, नाजूक बन्सीलाल पारधी, ललिता विलास चौधरी, रत्नाबाई रमेश चौधरी, निलेश लक्ष्मण महाले, एकनाथ तिरसिंग भिल, सविता महेंद्र कुंभार, लिलाबाई नामदेव भिल आदींनी तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे २४ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यावर तहसिलदारांनी २९ रोजी विशेष सभा बोलावली आहे. या ठरावावर पुढे काय निर्णय होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.