मनपातील नवीन २ हजार जागांसाठी पाठविला जाणार आकृतीबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:44+5:302021-07-28T04:16:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपातील अनेक अधिकारी व कर्मचारी गेल्या दोन वर्षात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ...

Figures will be sent for 2,000 new seats | मनपातील नवीन २ हजार जागांसाठी पाठविला जाणार आकृतीबंध

मनपातील नवीन २ हजार जागांसाठी पाठविला जाणार आकृतीबंध

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपातील अनेक अधिकारी व कर्मचारी गेल्या दोन वर्षात मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे मनपातील रिक्त जागांची संख्या वाढल्याने मनपातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. त्याचा परिणाम अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरदेखील होत आहे. मनपाच्या नवीन जागा भरण्यासाठी काही वर्षांपुर्वी आकृतीबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने आता मनपा प्रशासनाने नवीन प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार काही जागा व्यपगत करून व काही जागा नव्याने निर्माण करून अशा २ हजार ११ जागांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

मनपात सध्यस्थितीत १ हजार ६०० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, एकूण पदांची आवश्यकता ही २ हजार ६६३ इतकी असून, मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागांची भरती झाल्यास त्याचा परिणाम मनपाचा अस्थापना खर्चावर देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने नवीन आकृतीबंध तयार करताना काही जागा व्यपगत केल्या आहेत. येत्या महासभेपुढे नवीन आकृतीबंधाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून, महासभेची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

विभागनिहाय मागविण्यात आली माहिती

नवीन आकृतीबंधासाठी मनपातील सर्व विभागातील रिक्त जागांची माहिती मागविण्यात आली. त्यातून ज्या जागांची आवश्यकता नाही अशा जागा व्यपगत करून, इतर विभागात व मनपातील इतर ठिकाणी आवश्यक असलेल्या नवीन जागांची निर्मिती मनपाकडून नवीन आकृतीबंधामध्ये करण्यात आली आहे.

विभाग निहाय आवश्यक पदांची संख्या

प्रशासन सेवा - १ हजार २४९

महसूल - २३

वित्त व लेखा - २७

अभियांत्रिकी - ३२८

आरोग्य - ३२१

क्रीडा - ३

आस्थापना खर्च कमी करण्यावर भर

महापालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. त्यात मनपाचा आस्थापना खर्च हा एकूण खर्चाच्या तुलनेने ५१ टक्के इतका आहे. मनपाचा हा खर्च ३५ टक्के अपेक्षित आहे. या अतिरिक्त खर्चामुळे मनपातील मनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्यासही अडचणी येत आहेत. शासन निर्णयानुसार ज्या महापालिकांचा आस्थापना खर्च ३५ टक्के आहे. त्याच महापालिकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधाच्या प्रस्तावात अस्थापना खर्चाचा विचार करूनच अनेक पदे व्यपगत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपातील सध्यस्थिती - १६००

एकूण रिक्त पदे - २ हजार ६६३

व्यपगत केलेली पदे - १५३७

मंजूर पदे - २ हजार ११

नवीन प्रस्तावित पदे - ८८५

Web Title: Figures will be sent for 2,000 new seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.