हिंगणघाटच्या घटनेच्या पुनरावृत्तीची भीती... विद्यार्थिनी व तरुणी असुरक्षितच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:42 PM2020-02-12T12:42:24+5:302020-02-12T12:43:21+5:30

एकतर्फी प्रेमातून छेडखानी

Fear of recurrence of Hinganghat incident ... Students and girls unsafe! | हिंगणघाटच्या घटनेच्या पुनरावृत्तीची भीती... विद्यार्थिनी व तरुणी असुरक्षितच !

हिंगणघाटच्या घटनेच्या पुनरावृत्तीची भीती... विद्यार्थिनी व तरुणी असुरक्षितच !

Next

सुनील पाटील
जळगाव : एकतर्फी प्रेमातून हिंगणघाट, जि.वर्धा येथे प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्टÑात संताप व्यक्त होत आहे. हिंगणघाटमध्ये अशी घटना घडली असली तरी जळगावातदेखील एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनी, तरुणी व महिलांची छेडखानी होत असल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यात एकतर्फी प्रेम असो की छेडखानीच्या दहा घटनांची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे तर निर्भयाच्या पथकानेही शेकडोच्यावर तरुणांना समज देवून सोडले आहे.
एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून जाळल्याची घटना हिंगणघाट, जि.वर्धा येथे ३ फेब्रुवारी रोजी घडली. १० फेब्रुवारी रोजी तिची मृत्यूशी झुंज थांबली. या घटनेचा समाजमनातून सर्वत्र निषेध होत असून हल्लेखोराला तात्काळ कठोर शिक्षा मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन सुरु आहेत. जळगाव शहरात अशी घटना घडली नसली तरी घडलेल्या घटनांवरुन हिंगणघाटची पुनरावृत्ती होते की? काय अशी भीती वाटू लागली आहे. शहरात असे काही ठिकाण आहेत की तेथे महिला, विद्यार्थिनी व तरुणींची नेहमीच छेड काढली जाते.
टवाळखोरांना उरला नाही धाक
शहरातील काही घटना पाहता तरुणी व विद्यार्थिनींची छेड काढल्यानंतरही आपले कोणीच काही करु शकत नाही ही भावना टवाळखोरांच्या मनात निर्माण झाल्याने त्यांची दिवसागणिक हिमत वाढत चालली आहे. रस्त्याने जाणारे नागरिक असा की घटनास्थळाजवळील व्यावसायिक आपल्या घरातला विषय नाही ना? मग जावू द्या म्हणून या घटनांकडे दुर्लक्ष करतात. नाजूक विषयात अशी मानसिकता नागरिकांची झाली होत असेल तर टवाळखोरांना ते फावणारच. सर्वाधिक घटना या जी.डी. नंदीनीबाई बेंडाळे महाविद्यालयाच्या परिसरात घडतात. तेथे शाळा सुरु होण्याच्या २० मिनिटे तर शाळा सुटण्याच्या २० मिनिटे आधी टवाळखोर थांबतात. पोलिसांचे पथक कधी असते तर कधी नसते, त्यामुळे तरुणी व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हे आहेत छेडखानीचे टॉप टेन ठिकाण
१) नंदीनीबाई बेंडाळे महाविद्यालय परिसर
२) मू.जे.महाविद्यालय परिसर
३) आयएमआर विधी महाविद्यालय परिसर
४) मेहरुण तलाव परिसर
५) फुले मार्केट परिसर
६) प.न.लुंकड शाळा परिसर
७) खान्देश सेंट्रल मॉल परिसर
८) बस स्थानक परिसर
९) काव्यरत्नावली चौक
१०) पिंप्राळा बाजार
का वाढते टवाळखोरांची हिंमत अन् नागरिकांची उदासिनता
पीडित तरुणी भीतीपोटी कुटुंबाला सांगत नाही
आपल्या घरातील विषय नाही ना? ही नागरिकांची मानसिकता
पोलिसांचा वावर अगदी कमी असतो
अनेक ठिकाणी शिक्षक किंवा संस्थाचालकांची उदासिनता
ज्या व्यक्तीने पुढाकार घेतला, त्यालाच टवाळखोरांकडून मारहाण किंवा धमकी

अशा आहेत एकतर्फी प्रेम व छेडखानीच्या घटना
२६ डिसेंबर : रामेश्वर कॉलनीत महिलेची छेड काढली, गुन्हा दाखल
२७ डिसेंबर : सुप्रीम कॉलनीत महिलेची छेड काढली, गुन्हा दाखल
२८ डिसेंबर : एकतर्फी प्रेमातून तांबापुरात महिलेचे चुंबन घेण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
२९ डिसेंबर : परिचारिका तरुणीचा तिघांकडून छळ, जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल
१६ जानेवारी : तरुणीची छेड काढणाऱ्याविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा
१६ जानेवारी : एकतर्फी प्रेमातून जी.डी.बेंडाळे महाविद्यालयासमोर विद्यार्थिनीची छेड काढणाºया दोघांना चोपले
२३ जानेवारी : एकतर्फी प्रेमातून बजरंग बोगद्याजवळ अल्पवयीन मुलीची छेड काढली
१ फेब्रुवारी : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला छेडणाºयाविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
५ फेब्रुवारी : जी.डी.बेंडाळे महाविद्यालयासमोर विद्यार्थिनीची छेड काढणाºया दोघांना चोपले
९ फेबु्रवारी : एकतर्फी प्रेमातून फुले मार्केट परिसरात तरुणीची छेड काढली

Web Title: Fear of recurrence of Hinganghat incident ... Students and girls unsafe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.