शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

मुलाच्या आजारपणामुळे पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:22 PM

घरात गळफास

जळगाव : प्रचंड पैसा खर्च करुनही मुलावर उपचार करण्यात कमी पडलो आणि अशाही परिस्थितीत मुलगा जगण्याची उभारी देत असताना स्वत:लाच दोषी मानून गणेश भिकमचंद जोशी (४०, रा.सदगुरु नगर, अयोध्या नगर) या तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जोशी हे डाळी व्यवसायात कमिशन एजंट म्हणून काम करायचे. मोठा मुलगा रुद्र याला हृदयाचा आजार आहे. त्याच्या उपचारासाठी जोशी यांनी खूप पैसे खर्च केले, त्यातून कर्जबाजारीही झाले, मात्र तरीही मुलाचा आजार बरा करु शकत नाही हे प्रचंड नैराश्य त्यांना आले होते. अशा परिस्थितीतही मुलगा त्यांना ‘पप्पा होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही काळजी करु नका’ असे सांगून जगण्याला बळ देत होता. लहानशा मुलाला किती समज आहे, आपण का कमी पडतो म्हणून ते सतत नैराश्यात रहात होते. बुधवारी पत्नी पूजा शेजारी गेल्या असताना त्यांनी राहत्या घरात किचनमध्ये पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. लहान मुलगा प्रणव हा घरात आला असता त्याला हे भयावह दृश्य दिसले. त्याने तातडीने आईला ही घटना कळविली.अत्यंत मनमिळावू स्वभावगणेश जोशी अत्यंत मनमिळावू व मदतीला धावून जाणार तरुण होता, असे शेजारील लोकांनी सांगितले. आर्थिक परिस्थितीत जेमतेम होती. कोल्हे यांच्या मालकीच्या भाड्याच्या घरात रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूजा, मुलगा रुद्र, प्रणव, भाऊ शिवा असा परिवार आहे.रस्त्यात थांबला श्वासशेजारी राहणारा संकेत राजेंद्र चौधरी या तरुणाने तातडीने घरी धाव घेऊन गणेश यांना खाली उतरवले व शेजारील तरुणांच्या मदतीने तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. रस्त्यात असताना त्यांचा श्वास सुरु होता, मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव