बिलाशिवाय शेतकऱ्यांनी खते खरेदी करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:46+5:302021-07-14T04:19:46+5:30
गावात कोणी व्यक्ती बिगरबिलाने कोणतेही खते किंवा कीटकनाशके विक्री करीत असेल, तर अश्या व्यक्तीकडून बिगर बिलाने खते, कीटकनाशके विकत ...

बिलाशिवाय शेतकऱ्यांनी खते खरेदी करू नये
गावात कोणी व्यक्ती बिगरबिलाने कोणतेही खते किंवा कीटकनाशके विक्री करीत असेल, तर अश्या व्यक्तीकडून बिगर बिलाने खते, कीटकनाशके विकत घेऊ नये व भविष्यातील फसगत टाळावी. असे कोणी व्यक्ती कोणतेही बियाणे, खते किंवा कीटकनाशके विक्रीसाठी आल्यास त्याची माहिती तत्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समिती कृषी विभागास द्यावी.
जादा दराने किंवा लिंकिंग करून खते विक्री होत असल्यास कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी.
शेतकरी बांधवांनी खते खरेदी करताना आधार क्रमांक देऊन आपल्या बोटांचे ठसे विक्रेत्याकडील पाॅस मशीनवर देऊनच खत खरेदी करावे. पिकांना केवळ युरिया खत न देता इतर मिश्र खत व सेंद्रिय तसेच जैविक खतदेखील द्यावे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. प्रत्येक शेतकऱ्यास महिन्याला सर्व प्रकारची खते मिळून केवळ ५० बॅग खरेदी करता येतील, असे केंद्र शासनाने ठरवून दिले आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे शेती असल्यास त्यांचे आधार क्रमांक व बोटांचे ठसे पाॅस मशीनवर दिल्यास शेतकऱ्यांची व विक्रेत्यांची गैरसोय होणार नाही, असे कृषी विभागातर्फे कळवण्यात आले आहे.