शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीत पडून, ई-केवायसीने रोखली ३५५ कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:19 IST2025-12-11T14:09:04+5:302025-12-11T14:19:29+5:30
मदतीचा 'पूर' नियमामुळे अडला, अतिवृष्टीने ग्रासलेल्या मराठवाड्याची सर्वाधिक रक्कम

शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीत पडून, ई-केवायसीने रोखली ३५५ कोटींची मदत
कुंदन पाटील
जळगाव : अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करून निधीही उपलब्ध करून दिला. मात्र, ई-केवायसीसह तांत्रिक कारणास्तव लाभ न घेऊ शकलेल्या ५ लाख ४२ हजार १४१ शेतकऱ्यांचे ३५५ कोटी ५० लाख रुपये शासनाच्या तिजोरीतच पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यात एकट्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल १६५ कोटी ७२ लाखांचा समावेश आहे.
एकूण शेतकरी ५४२१०१
अकोला – २४३
अमरावती – ३०५
बुलडाणा – २९६
यवतमाळ – १९६
वाशीम – १६३
बीड – १९२५
लातूर – १७८७
उस्मानाबाद – १७३४
जालना – २४६
परभणी – ३२५
हिंगोली – २१३
नांदेड – १०५५
औरंगाबाद – १६९
जळगाव – ४३१
धुळे – ३६७
नंदूरबार – २८९
नाशिक – १३७३
अहमदनगर – १५५५
पुणे – ११३३
सातारा – ४४७
सांगली – १७३
सोलापूर – ६३९
कोल्हापूर – २७२
रत्नागिरी – ९३
सिंधुदुर्ग – १००
ठाणे – १०९
पालघर – १०१
मुंबई उपनगर – ६५
मुंबई शहर – ३१
रायगड – १०१
एकूण मदतीची रक्कम (लाखांत) - ३५५५९
अकोला – ७८८
अमरावती – ३९५६
बुलडाणा – २४४२
यवतमाळ – ४४२०
वाशीम – ३८७६
बीड – २४४८७
लातूर – ४५३५९
उस्मानाबाद – ४५६९०
जालना – १९३७०
परभणी – ३८४५६
हिंगोली – ४४२४१
नांदेड – ५२०११
औरंगाबाद – १४४४५
जळगाव – ४९५५८
धुळे – ४८२२६
नंदुरबार – २२३३७
नाशिक – ४९२२९
अहमदनगर – ३३४२०
पुणे – १९१९४
सातारा – २१९८८
सांगली – ८८७५
सोलापूर – १५६०१
कोल्हापूर – २४४२६
रत्नागिरी – २२८८
सिंधुदुर्ग – ८६३
ठाणे – १०२८
पालघर – ७८२
मुंबई उपनगर – ३२२
मुंबई शहर – २३९
रायगड – ४६०४