एरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:04 IST2018-10-12T22:01:21+5:302018-10-12T22:04:36+5:30
मूगपाट शिवारात कांद्याला पाणी देत असताना लक्ष्मण नारायण भिल (वय-३८) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

एरंडोल येथे कांद्याला पाणी भरताना शेतकऱ्याचा मृत्यू
ठळक मुद्देएरंडोलपासून काही अंतरावर असलेल्या मूगपाट शिवारातील घटनागुराखी पाणी पिण्यासाठी आल्यानंतर उघड झाली घटनाग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी केले मयत घोषित
एरंडोल : तालुक्यातील मूगपाट शिवारात कांद्याला पाणी देत असताना लक्ष्मण नारायण भिल (वय-३८) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक गुराखी पाणी पिण्यासाठी शेतात आला त्यावेळी लक्ष्मण भिल हे कोसळलेले आढळून आले. या घटनेबाबत गुराख्याने ग्रामस्थांना माहिती दिली. लक्ष्मण भिल यांना रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या शेतकºयाचा मृत्यू हृदयविकाराने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.