शेतक-याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 22:44 IST2019-12-24T22:41:35+5:302019-12-24T22:44:21+5:30
तालुक्यातील कंडारी येथे आबासाहेब अमृतराव काळे (५२) या शेतकºयाने आपल्या शेतात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. काळे यांच्यावर पतसंस्थेचे एक लाख रुपये कर्ज असून यातून हा निर्णय घेतल्याची शक्यताही नातेवाईकांनी व्यक्त केली.

शेतक-याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील कंडारी येथे आबासाहेब अमृतराव काळे (५२) या शेतकºयाने आपल्या शेतात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. काळे यांच्यावर पतसंस्थेचे एक लाख रुपये कर्ज असून यातून हा निर्णय घेतल्याची शक्यताही नातेवाईकांनी व्यक्त केली.
आबासाहेब अमृतराव काळे हे मंगळवारी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. तेथे त्यांनी विषप्राशन केल्याचे शेजारील शेतकºयाच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस पाटील कैलास रामचंद्र सुर्वे यांना माहिती दिली. सुर्वे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात प्रकार कळविला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. काळे यांच्या पश्चात पत्नी सीमा, दोन मुले राहूल व अतुल आहे. राहूल प्राध्यापक असून अतुल हा खासगी बँकेत नोकरीला असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कापडणीस करीत आहे.