शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘मधुकर’च्या वार्षिक सभेत थकीत पेमेंटसाठी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 18:36 IST

मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालक मंडळाला ऊस उत्पादकांच्या १५ कोटींच्या थकीत पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देसंचालकांना जावे लागले रोषाला सामोरेगोंधळातच सर्व विषय मंजूर

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालक मंडळाला ऊस उत्पादकांच्या १५ कोटींच्या थकीत पेमेंटसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. रविवारी आयोजित सभा गोंधळात पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते.‘मधुकर’च्या कार्यस्थळावर ही वार्षिक सभा झाली. सभा सुरू होण्यापूर्वी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करत असताना शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली व उसाचे पेमेंट कधी देणार याचा जाब संचालक मंडळाला विचारण्यास सुरुवात केली. यावेळी चेअरमन शरद महाजन यांनी ऊस उत्पादकांना समजावत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र ऊस उत्पादक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी संतप्त शेतकºयांनी थेट व्यासपीठापर्यंत धाव घेतली. यावेळी चेअरमन शरद महाजन यांनी जोपर्यंत शासनाकडून थकहमी मिळत नाही तोपर्यंत थकीत पेमेंट करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व स्तरावरून पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगितले.भागवत पाटील यांनीही शेतकºयांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. शेतकरी शांत होत नसल्याचे लक्षात येताच चेअरमन महाजन यांनी सभा तहकूब करण्याचे जाहीर केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन राकेश फेगडे तसेच विजय पाटील यांनी शेतकºयांना शांत करीत सभा होणे गरजेचे आहे. त्याशिवाय शासनाकडे ठराव जाऊ शकत नाही. आपली मागणी रास्त आहे पण त्यासाठी सभा होऊ द्या, असे आवाहन केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाले.यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार हरिभाऊ जावळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना कारखाना बंद व्हायला नको. जी परिस्थिती जिल्ह्यातील अन्य कारखान्यांची आहे ती ‘मधुकर’ची होता कामा नये, असे सांगत कारखान्याचा संचित तोटा वाढल्याने जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी येत आहे. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. सर्वांचे पेमेंट अदा करण्यासाठी एक तर थकहमी मिळवणे अथवा संचालक मंडळाची मालमत्ता तारण ठेवणे हे पर्याय आहे मात्र त्यासाठी उच्च न्यायालयाचेही काही निर्देश आहे. आगामी काळात त्यावर निश्चित योग्य तो तोडगा निघेल व सर्वांचे पेमेंट दिले जाईल, असे सांगत सर्वांना आश्वस्त केले.यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मधुकर कारखान्यावर या विभागाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, ज्या वेदना शेतकºयांच्या आहे त्याच आमच्यासुद्धा आहेत, थकहमीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला लवकरच यश येईल.शासनाकडून आरआरसीची कारवाई झाली आहे व या कारवाईविरोधात जिल्हा बँक न्यायालयात गेली आहे या सर्व विषयावर एकत्र बसून मार्ग काढला जाईल. तोवर संयम ठेवण्याचे आवाहन केले.व्यासपीठावर माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, यांच्यासह जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, शेतकी संघाचे अध्यक्ष तथा संचालक नरेंद्र नारखेडे, कामगार युनियनचे अध्यक्ष किरण चौधरी, कार्यकारी संचालक एस.आर.पिसाळ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, सर्व संचालक व हंगामात जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी उपस्थित होते. आभार व्हाईस चेअरमन भागवत पाटील यांनी मानले

टॅग्स :FarmerशेतकरीFaizpurफैजपूर