अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:03+5:302021-09-12T04:20:03+5:30
शेंदूर्णी, ता. जामनेर : दि. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागातील घराचे ...

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची मदत करावी
शेंदूर्णी, ता. जामनेर : दि. ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे व ग्रामीण भागातील घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांनी तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष भेटून निदर्शनास आणून देत लेखी मागणी केली.
संजय गरुड यांनी मंत्र्यांना निदर्शनास आणून देताच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच, लवकरच मदत जाहीर करू, असे आश्वासन दिल्याचे सांगितले.
पक्षाच्या बैठकीत मांडल्या तालुक्यातील समस्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार व विधानसभेचे पराभूत उमेदवार यांची बैठक बोलविली होती. या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांसह सर्व मंत्री उपस्थित होते.
यावेळी संजयराव गरुड यांनी तालुक्यातील धरण, तलाव सिंचन, शेती तसेच इतर समस्या मांडल्या. पंचायत समितीमधील तक्रारींची चौकशी करण्याची मागणी केली.