गारखेडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:23 IST2018-09-13T22:22:04+5:302018-09-13T22:23:30+5:30
येथील देवीदास भगवान राठोड (वय-५७) या शेतकºयाने स्वत:च्या शेताजवळील नालाबांधमधील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार १३ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

गारखेडा येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
ठळक मुद्देशेताजवळील नालाबांधमध्ये केली आत्महत्याशेतीसाठी घेतले होते कर्जनापिक व उत्पन्नातील घट मुळे होते चिंतेत
गारखेडा बुद्रुक, ता.जामनेर : येथील देवीदास भगवान राठोड (वय-५७) या शेतकºयाने स्वत:च्या शेताजवळील नालाबांधमधील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार १३ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
देवीदास राठोड यांच्याकडे १० एकर शेती आहे. या शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. शेतीच्या उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत असल्याने तसेच नापिकीमुळे त्यांच्यावरील कर्ज वाढले होते. यासाºयाला कंटाळून त्यांनी शेताजवळील नालाबांधातील पाण्यात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.