चिंचोलीत शेतमजुराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 17:53 IST2017-10-12T17:43:30+5:302017-10-12T17:53:59+5:30
यावल तालुक्यातील चिंचोली येथील शेतमजूर तानकू घमा पटाईत (वय ७५) यांनी रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

चिंचोलीत शेतमजुराची आत्महत्या
ठळक मुद्देमयत शनिवारपासून बेपत्ता.सीताफळाच्या झाडाला ठिबक नळीच्या साहाय्याने घेतला गळफास.यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद.
आॅनलाईन लोकमत
यावल, दि.१२ : तालुक्यातील चिंचोली येथील शेतमजूर तानकू घमा पटाईत (वय ७५) यांनी रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
तानकू पटाईत हे शनिवारी रात्री पासूनच बेपता होते. त्यांनी कासारखेडे शिवारातील शरद साळुंखे यांच्या शेतातील सीताफळाच्या झाडास ठिबक नळीने गळफास लाऊन आत्महत्या केली. कासारखेडेचे पोलीस पाटील प्रवीण पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई , नातवंडे असा परीवार आहे.