अंगावर वीज पडून शेतकरी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 21:11 IST2024-10-18T21:11:39+5:302024-10-18T21:11:56+5:30
अंगावर वीज पडून नगरदेवळा ता. पाचोरा येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

अंगावर वीज पडून शेतकरी ठार
संजय सोनार / नगरदेवळा (जि. जळगाव) : परतीच्या पावसाने चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा परिसराला शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा झोडपून काढले. दीड तासाच्या मुसळधार पावसाने कापसासह अन्य पिकांना फटका बसला आहे. दुसरीकडे अंगावर वीज पडून नगरदेवळा ता. पाचोरा येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
पांडूरंग त्र्यंबक महाजन (६५, रा. नगरदेवळा ता. पाचोरा) असे या ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते निवृत्त शिक्षक होते. चुंचाळे शिवारातील शेतातून परतत असताना ही घटना घडली. दुसऱ्या घटनेत वीज पडून बैल व दोन वासरे ठार झाली आहेत.