दहशतवादाच्या विरोधात लढ्यासाठी शेतकऱ्याने दिले एक लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 16:47 IST2025-04-27T16:47:51+5:302025-04-27T16:47:59+5:30

रावेर येथील शेतकऱ्याने खारीचा वाटा उचलत नायब तहसीलदारांकडे निधी सुपूर्द केला आहे.

Farmer donates Rs 1 lakh to fight terrorism | दहशतवादाच्या विरोधात लढ्यासाठी शेतकऱ्याने दिले एक लाख रुपये

दहशतवादाच्या विरोधात लढ्यासाठी शेतकऱ्याने दिले एक लाख रुपये

Raver Farmer : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याने देशभरात संतापाची लाट आहे. या दहशतवादाचा कायमचा बिमोड व्हावा यासाठी हातभार म्हणून केंद्राच्या दहशतवाद विरोधातील लढ्यासाठी रावेर येथील केळी उत्पादक शेतकरी तथा व्यापारी सुरेश त्र्यंबक नाईक यांनी पंतप्रधान मदतनिधीत एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश जमा केला आहे. 

निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून भ्याड हल्ला केला. या प्रकारामुळे सुरेश नाईक यांनी दहशतवाद्यांचा बीमोड करण्यात यावा, यासाठी पंतप्रधान साहाय्यता निधीत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून एक लाख एक हजार रुपयांची देणगी जमा करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्या अनुषंगाने त्यांनी शुक्रवारी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन व दहशतवादाच्या विरोधातील लढ्यासाठी पंतप्रधान साहाय्यता निधीत एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

दरम्यान, "दहशतवाद्यांचा बिमोड करण्यात यावा. आणखी किती दिवस असे हल्ले सहन करणार आहोत. त्यामुळे या दहशतवाद विरोधातील लढ्यासाठी खर्च लागेल, त्यात आपण खारीचा वाटा उचलला आहे," असं सुरेश नाईक यांनी म्हटलं आहे.

Web Title: Farmer donates Rs 1 lakh to fight terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.