शिरसोली येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 19:52 IST2021-01-23T19:52:08+5:302021-01-23T19:52:20+5:30
जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे रवींद्र सखाराम खलसे (४७) या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ...

शिरसोली येथे शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे रवींद्र सखाराम खलसे (४७) या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. खलसे यांची पत्नी जळगाव येथे भावाला भेटण्यासाठी आली होती तर मुलगी शाळेत गेली होती. ही मुलगी घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. पोलीस पाटील शरद पाटील यांनी धाव घेऊन खलसे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.