Farmer commits suicide in Mamurabad | ममुराबाद येथे शेतकऱ्याची आत्महत्या

ममुराबाद येथे शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव- स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून तरूण शेतकºयाने जीवनयात्रा संपविल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ममुराबाद येथे घडली़ महेंद्र एकनाथ पाटील (वय २६, रा़ ममुराबाद) असे मयताचे नाव आहे़
महेंद्र पाटील हा ममुराबाद येथे आई-वडील व पत्नी, मुलासह वास्तव्यास होता़ शेती करून घरचा उदरनिर्वाह करायचा़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी शेतात गेल्यानंतर त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला़ काहीवेळानंतर आई-वडील शेतात आल्यानंतर त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी त्याठिकाणी धाव घेत त्यास खाली उतरविले़ नंतर नागरिकांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती महेंद्र यास मृत घोषित केले़ दरम्यान, महेंद्र याने काही महिन्यांपूर्वी शेतात विहिर केली होती़ मात्र, पुरेशी वीज नसल्यामुळे स्वखर्चातून विद्युत खांब टाकले़ मात्र, तरी देखील नापिकी व उत्पादन कमी असल्यामुळे तो तनावात होता़ त्यात कर्जाचे डोंगऱ त्यातूनच आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी वर्तविला आहे़ दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Web Title:  Farmer commits suicide in Mamurabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.