पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:53 IST2020-04-22T18:51:42+5:302020-04-22T18:53:19+5:30
भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर या शेतकºयाने आत्महत्या केली.

पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर (वय ३५) या तरुण शेतकºयाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
सूत्रांनुसार, राहत्या घरातील स्लॅबच्या बंगळीच्या कडीला लेडीज रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
गावातील विनोद गंगाराम पाटील यांनी पाहिल्यानंतर त्यांनी उपसरपंच भानसिंग राजपूत यांना कळविले. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर भानसिंग पाटील, गणसिंग संतोष पाटील, राहुल तुकाराम पाटील, भास्कर पोपट पाटील अशांनी मयतास उतरविले. ईश्वर ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून कुटीर रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले.
उपसरपंच भानसिंग राजपूत यांनी पारोळा पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल प्रकाश चौधरी करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.