पेन्शन ऑर्डर देऊन कर्मचाऱ्यांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:03+5:302021-08-01T04:16:03+5:30
जळगाव : निवृत्तीनंतर ज्या पेंशन ऑर्डरसाठी सहा सहा महिने कर्मचाऱ्यांना भटकंती करावी लागत होते. तीच आता त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच ...

पेन्शन ऑर्डर देऊन कर्मचाऱ्यांना निरोप
जळगाव : निवृत्तीनंतर ज्या पेंशन ऑर्डरसाठी सहा सहा महिने कर्मचाऱ्यांना भटकंती करावी लागत होते. तीच आता त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच देण्याचा नवीन पायंडा जि. प. सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी पाडला आहे. त्यांनी जुलैत सेवानिवृत्त झालेल्या ६ कर्मचाऱ्यांना ही पेंशन ऑर्डर देऊनच निरोप दिला.
४ शिक्षक, पशुसंवर्धन व बांधकामचा प्रत्येकी १ कर्मचारी यांना शुक्रवारी निरोप देण्यात आला. त्यांना सीईओंच्या हस्ते पेंशन ऑर्डर देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे उपस्थित होते. सेवानिवृत्तीनंतर त्याची ३ ते ६ महिने पेंशन ऑर्डर मिळविताना ससेहोलपट होत असते. काही विभागात अनेक कर्मचाऱ्यांना यापेक्षा देखील अधिक कालावधी लागत असल्याने सेवानिवृत्तीनंतर देखील लाभ मिळण्यास विलंब होत असतो. मात्र, आता कामे वेळेवर करण्याच्या सूचना नवीन सीईओंनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली आहे. निवृत्ती वेतनासह सर्व लाभ या कर्मचाऱ्यांना आता महिना, दीड महिन्याच्या आतच मिळणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनात प्रथमच सीईओंच्या हस्ते पेंशन ऑर्डर देण्यात आल्या आहेत. यापुढेही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी ऑर्डर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.