जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर तब्बल एक कोटी रुपयांच्या जवळपास नकली नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
मलकापूरकडून भुसावळकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या दोन संशयित प्रवाशांचा रेल्वे पोलिसांना संशय आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या बॅगेत नकली नोटा आढळून आल्या. पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरील एक नोट असली तर बाकी बंडलमध्ये चिल्ड्रन बँक लिहिलेल्या नकली नोटा असल्याची माहिती रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिली.
पोलिसांना संशय येताच एक संशयित फरार झाला आहे. दरम्यान दुसऱ्या संशयिताला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.