तरतुदींचे पालन न केल्यास रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 10:26 PM2021-05-22T22:26:14+5:302021-05-22T22:26:47+5:30

रेशन दुकानदारांनी तरतुदीचे पालन करावे अन्यथा परवाने रद्द करणार असल्याची तंबी तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली आहे.

Failure to comply with the provisions will result in revocation of ration shopkeepers' licenses | तरतुदींचे पालन न केल्यास रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करणार

तरतुदींचे पालन न केल्यास रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करणार

Next
ठळक मुद्देभडगाव तहसीलदार सागर ढवळे, रेशन दुकानदारांची घेतली बैठक.

लोकमत न्यूज नेटवर्क

भडगाव : तालुक्यातील काही रेशन दुकानातील काळाबाजाराला आळा बसविण्यासाठी दुकानदारानी बाहेर दर्शनी भागी ‘माहिती फलक’ व माल घेतल्याची पावती देणे, शिल्लक माल तपशील, धान्ये दिलेल्या ग्राहकांची यादी लावणे, अशा तरतुदीचे पालन करावे अन्यथा परवाने रद्द करणार असल्याची तंबी तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली आहे.

याबाबत विजय पाटील यांच्यासह काहींनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची तहसीलदार सागर ढवळे यानी दखल घेऊन सर्व रेशन दुकानदारांची बैठक घेऊन या तरतुदींचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधितांनी माहिती फलक लावणे, पावती देणे, वाटप धारकांची यादीसह माहिती नागरिकांना वाचता येईल, अशा दर्शनी भागी लावण्याचे आदेश दिले आहेत. जे रेशन दुकानदार या तरतुदींचे पालन करणार नाहीत, त्याचे शासन परवाने रद्द करण्याची ताकीद तहसीलदारांनी दिली आहे. राज्ये, केंद्रीय पंतप्रधान गरीब कल्याण योजनांमध्ये भ्रष्टाचार केला असेल किवा कुणाची तक्रार आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काही रेशन दुकानदारांनी ग्राहकांना (मोफत) रेशन देण्यास नकार दिल्याप्रकरणी तक्रार विजय पाटील यांनी तहसीलदार यांचेकडे दाखल करून शासन तरतुदींचे पालन करण्याची मागणी केली होती.

सर्व रेशनिंगधारकाची मोफत धान्ये वाटपाची चौकशी

तहसीलदारांसह तक्रारदार व समिती, मालाचा आरसी नंबर, रेशन दुकानाची पडताळणी करीत आहेत. तसेच मागील १०-१२ वर्षापासून तत्कालिन तहसीलदारानी या प्रकरणाची दखलच घेतली नव्हती. तरतुदीचे पालन झाल्यास ४० टक्के भ्रष्टाचारास आळा बसण्याची शक्यता आहे. आज भडगाव तहसीलदार सागर ढवळे यांनी शहरातील २ रेशन दुकानांना अचानक भेट देऊन पाहणी केली. रजिस्टर आदी तपासणी करून संबंधित दुकानदारांना सूचनाही केल्या, अशी माहीती तहसीलदार सागर ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Failure to comply with the provisions will result in revocation of ration shopkeepers' licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.