शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचं नाथाभाऊंशी बोलण झालं, 'त्या' घड्याळाबाबतही रक्षा खडसेंनी मौन सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 11:54 IST

जळगाव जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता फडणवीस दौऱ्यावर आले असता मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोहोचले.

ठळक मुद्देफडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते असं नाही. यापूर्वीही ते घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळेच, नाथाभाऊंचंही त्यांच्याशी बोलणं झालं,' असं रक्षा खडसे म्हणाल्या

मुंबई - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला गतिरोधक ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे कुठेही दिसले नाहीत. तिकडे खडसे मात्र सोमवारीच मुंबईला पोहोचले होते. मात्र, या भेटीवेळी एकनाथ खडसेंसोबतही फडणवीस यांचं बोलणं झाल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं. 

जळगाव जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता फडणवीस दौऱ्यावर आले असता मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोहोचले. सुमारे २० मिनिटे फडणवीस हे मुक्ताई सदनात होते. या भेटीबाबत रक्षा खडसे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. घरातील कमळातील घड्याळाबद्दलही त्यांनी मौन सोडलं. 

'फडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते असं नाही. यापूर्वीही ते घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळेच, नाथाभाऊंचंही त्यांच्याशी बोलणं झालं,' असं रक्षा खडसे म्हणाल्या. 'मी भाजपची खासदार आहे. माझ्या पक्षाचे नेते मतदारसंघात आल्यानंतर त्यांना घरी बोलवणं, चहापाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे, ते मी केलं. यावेळी कार्यकर्त्यांच्याही भेटी झाल्या,' असं त्यांनी सांगितलं. कोथलीतील घरात असलेल्या कमळाच्या चिन्हाच्या घड्याळाबद्दल विचारलं असता, 'नाथाभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत हे खरं आहे. पण, ते पूर्वी भाजपमध्ये होते, तेव्हापासूनच्या या वस्तू आहेत.', असं स्पष्टीकरण रक्षा खडसेंनी दिलं आहे. 

इतर कुठलेही कारण नव्हते - फडणवीस

फडणवीस व खडसे यांच्यात ते एकाच पक्षात असतानाही पटले नाही. तर खडसे यांनी त्यांच्यामुळेच भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, असे सांगितले गेले आहे. अशात फडणवीस हे खडसे यांच्या निवासस्थानी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, खासदार रक्षा खडसे या भाजपच्या असून त्यांनी चहापानाचे निमंत्रण दिले. त्यामुळे आपण तेथे गेलो होतो. यात इतर कुठलेही कारण नव्हते, असे फडणवीस यांनी रावेर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalgaonजळगावeknath khadseएकनाथ खडसेMumbaiमुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेस