पाचोरा रोटरी क्लबतर्फे पत्रकारांची नेत्र तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:30+5:302021-09-13T04:15:30+5:30
येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील संचालित तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त १२ सप्टेंबर रोजी पत्रकारांसाठी ...

पाचोरा रोटरी क्लबतर्फे पत्रकारांची नेत्र तपासणी
येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील संचालित तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त १२ सप्टेंबर रोजी पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी रोटरी डिस्ट्रिक्टचे उपप्रांतपाल राजेश मोर, भरत सिनकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील, रोटे चंद्रकांत लोढाया, डॉ. गोरख महाजन, डॉ. अमोल जाधव, रो. नीलेश कोटेचा, रो. पवन अग्रवाल डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. प्रशांत सांगळे, रो. अतुल शिरसमणे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. सचिन चौधरी, रावसाहेब बोरसे उपस्थित होते.
या नेत्रतपासणीला डॉ. बाळकृष्ण पाटील यांच्यासमवेत त्यांचे सहकारी गोपाल पाटील, हर्षल अहिरे, तसेच संतोष पुर्सनानी व सचिन पुर्सनानी यांचे सहकार्य लाभले. सुमारे ५५ पत्रकार बांधव या शिबिराला उपस्थित होते, पैकी ५० पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली. रोटे प्रा. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.