पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:58 IST2020-11-28T18:57:51+5:302020-11-28T18:58:02+5:30
२९ वा दिक्षांत समारंभ : विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध

पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाण पत्र घ्यावयाचे आहेत,अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठातर्फे ऑक्टोंबर-२०१९ व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि पी.एचडी. धारक अशा सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होम पेजवरील वरील स्टुडंट कॉर्नर एक्झामिनेशन कॉन्व्हकेशन वर उपलब्ध आहेत. त्यानुसार विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.