महागडी सायकल लांबविली ; एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:15 IST2020-05-17T20:15:02+5:302020-05-17T20:15:07+5:30
जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातील टी़एम़ नगर भागातून १२ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी सायकल आणि हवा मारण्याचा पंप चोरून ...

महागडी सायकल लांबविली ; एकाला अटक
जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातील टी़एम़ नगर भागातून १२ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी सायकल आणि हवा मारण्याचा पंप चोरून नेला होता़ याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी रामेश्वर कॉलनी येथून अविनाश रामेश्वर राठोड (रा़ मेहरूण) यास अटक केली असून त्यांच्याजवळून चोरीला गेलेली महागडी सायकल हस्तगत करण्यात आली आहे.
सिंधी कॉलनी भागातील टी़एम़नगरातील रहिवासी जितेंद्र श्रीचंद तलरेजा यांची महागडी सायकल व हवा मारण्याचा फूट पंप हा १२ मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाउंडमधून चोरून नेले होते़ त्यानंतर १३ मे रोजी याप्रकरणी तलरेजा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असता, सायकल चोरटा हा रामेश्वर कॉलनीत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार संशयित अविनाश राठोड याला अटक करण्यात आली़ त्याची चौकशी केली असता त्याने सायकल चोरी केल्याची कबूली दिली व पोलिसांना चोरलेली सायकल देखील काढून दिली आहे़ त्यासत न्यायालयात हजर केले असता सुनावणीअंती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे़ ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, हर्षवर्धन सपकाळे, सचिन चौधरी, सचिन पाटील यांनी केली आहे़ पुढील तपास पो.कॉ. हर्षवर्धन सपकाळे करीत आहे.