उरुस व प्रार्थनास्थळांमधून बॅगा लांबविणाºया अल्पवयीन मुलांच्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:28 IST2019-09-26T22:26:16+5:302019-09-26T22:28:37+5:30
नागपूर ते भुसावळ दरम्यान शहरामंध्ये होणारे उरुस व धार्मिकस्थळांमधून बॅगा व मोबाईल लांबविणाºया अमरावती येथील अल्पवयीन मुलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या टोळीकडून चोरीच्या वस्तू घेणाºया शेख निहाल उर्फ फरहान शेख आरीफ (१९, रा.कमेला ग्राऊंड, अमरावती) याला अटक केली आहे.

उरुस व प्रार्थनास्थळांमधून बॅगा लांबविणाºया अल्पवयीन मुलांच्या टोळीचा पर्दाफाश
जळगाव : नागपूर ते भुसावळ दरम्यान शहरामंध्ये होणारे उरुस व धार्मिकस्थळांमधून बॅगा व मोबाईल लांबविणाºया अमरावती येथील अल्पवयीन मुलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या टोळीकडून चोरीच्या वस्तू घेणाºया शेख निहाल उर्फ फरहान शेख आरीफ (१९, रा.कमेला ग्राऊंड, अमरावती) याला अटक केली आहे.
आरटीओ एजंट अन्सारी निसार शाह (३५, रा.भुसावळ) हे २५ जुलै रोजी दुपारी आपल्याकडील बॅग एका सुरक्षित ठिकाणी ठेवून ते प्रार्थनेसाठी गेले होते. त्यात रोख पाच हजार रुपये, बॅँकाचे पासबुक, मोबाईल व इतर महत्वाच्या वस्तू होत्या. शाह परत आले असता बॅग गायब झाली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
अमरावतीपर्यंत धागेदोरे
या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात अमरावतीपर्यंत धागेदोरे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी सहायक फौजदार राजेंद्र का.पाटील, अशोक महाजन, कमलाकर बागुल,किशोर राठोड, विनोद सुभाष पाटील, अरुण राजपुत, रणजित जाधव यांचे पथक अमरावती येथे तसेच हवालदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांना भुसावळ येथे रवाना केले होते. अधिकच्या तपासात अमरावती येथील दहा ते बारा जणांची अल्पवयीन मुलांची टोळी भुसावळ ते नागपूर दरम्यान उरुसमध्ये जावून चोºया करीत असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीचे सदस्य नागपूर येथे उरुस येथे गेले होते तर चोरीच्या वस्तू घेणारा शेख निहाल हा हाती लागला. या टोळीच्या शोधार्थ एक पथक कार्यरत आहे.