धक्कादायक! चहा करीत असताना गॕस सिलिंडरचा स्फोट; कुटुंबीय थोडक्यात बचावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 01:57 PM2021-10-15T13:57:00+5:302021-10-15T13:57:46+5:30

Explosion of Gas Cylinder : ग्रामस्थांनी आग नियंत्रणात आणून या कुटूंबाला धीर दिला.

Explosion of gas cylinder while making tea in jalgaon | धक्कादायक! चहा करीत असताना गॕस सिलिंडरचा स्फोट; कुटुंबीय थोडक्यात बचावले 

धक्कादायक! चहा करीत असताना गॕस सिलिंडरचा स्फोट; कुटुंबीय थोडक्यात बचावले 

Next

रावेर जि.जळगाव - चहा करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दसऱ्याच्या दिवशीच  संसाराची राखरांगोळी झाली. ही घटना ऐनपूर ता. रावेर येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता घडली. या स्फोटात कुटुंबीय थोडक्यात बचावले आहे. दिलीप जगन्नाथ बारी यांच्या घरात ही घटना घडली. घरातील महिला चहा करीत असताना ही घटना घडली. 

गॅस सिलिंडरच्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, टिनच्या छताच्या चिंधड्या उडून त्या २०० मीटर अंतरावर पडल्या. घरातील कपाट, अन्नधान्य, कपडे, भांडीकुंडी या स्फोटामुळे क्षणार्धात भस्मसात झाले. यात दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  ग्रामस्थांनी आग नियंत्रणात आणून या कुटूंबाला धीर दिला. सरपंच अमोल पाटील यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी मंडळाधिकारी जी. एन. शेलकर व तलाठी विजय शिरसाठ यांच्यासह घटनास्थळी भेट दिली.
 

Web Title: Explosion of gas cylinder while making tea in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app