कारगिल दिनानिमित्त सीमेवरील जवानांनी वेबिनारद्वारे व्यक्त केले अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:15 IST2021-08-01T04:15:58+5:302021-08-01T04:15:58+5:30
भगिनी मंडळ संचालित समाजकार्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असलेल्या या सेना दलाच्या काश्मीरच्या गंदरबार जिल्ह्यातील रायफल वुमन पदावर कार्यरत रुपाली ...

कारगिल दिनानिमित्त सीमेवरील जवानांनी वेबिनारद्वारे व्यक्त केले अनुभव
भगिनी मंडळ संचालित समाजकार्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असलेल्या या सेना दलाच्या काश्मीरच्या गंदरबार जिल्ह्यातील रायफल वुमन पदावर कार्यरत रुपाली धनगर, पेरास्लायडिंग विभागाचे दीपक पाटील, संदीप बडगुजर, बीएसएफचे जवान खलील तडवी, कोब्रा कमांडर चारुदत्त बडगुजर या पाचही सैनिकांनी आपल्या सीमेवरील व प्रशिक्षण दरम्यानच्या काळात आलेले अनुभव व चित्तथरारक माहिती देऊन सहभागींना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी सैनिक परिचय, प्रस्तावना या कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. मोहिनी उपासनी यांनी केले. स्वागतपर मनोगत भगिनी मंडळ व ईनरव्हिलतर्फे अध्यक्षा पूनम गुजराथी यांनी केले. वेबिनारमध्ये सहभागी उपस्थितांपैकी पत्रकार अनिलकुमार पालीवाल, सरला माळी, भावना गुजराथी, किरण पालीवाल, छाया गुजराथी आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले व सैनिकांना त्यांच्या देशसेवा कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.
कार्यक्रमात प्राचार्य ईश्वर सौंदाणकर, ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी, ईनरव्हिल क्लब सचिव मीना पोतदार, किरण पालीवाल व शंभराहून अधिक सदस्य व प्रतिनिधी सहभागी झाले होते.